Ladki Bahin Yojana News: या जानेवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का? असे चेक करा!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana News: नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की महाराष्ट्र राज्य सरकार हे महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे, आणि असेच आता महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवलेली आहे. तरी या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मानधन दिले जात आहे आणि अशाच प्रकारे एकूण 6 हफ्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. तर आता 7 व्या हप्त्या जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर या बाबत माहिती दिलेली आहे, ती आपण जाणून घेऊया.Ladki Bahin Yojana News

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मित्रांनो राज्य सरकारने जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुरुवात केलेली आहे. या योजनेच्या 2 कोटी 52 लाख लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्यात आली आहे. आतापर्यंत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे एकूण 9000 रुपये मिळालेले आहेत. आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे. राज्य सरकारनं डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम 24 डिसेंबरपासून वर्ग करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये महिलांना मिळेत आहे का पाहावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांचं लाडकी बहीण योजनेसंदर्भातील माहिती दिली आहे.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना 1500 रुपये देण्यात येतात. याशिवाय सरकारनं काही अटी देखील ठेवल्या आहेत. डिसेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार 2 कोटी 52 लाख महिलांच्या खात्यात 1500 रुपये पाठवण्यात आले होते. आता, जानेवारी महिन्यातील रक्कम कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

2100 रुपये अर्थसंकल्पानंतर?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा स्थापन होण्यासाठी गेमचेंजर ठरली होती. महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या जाहीर भाषणांमधून महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यास लाडक्या बहिणींना 1500 च्या जागी 2100 रुपये देणार म्हटलं होतं. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत विचार होईल, असं म्हटलं होतं. त्यामुळे राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

छगन भुजबळ यांनी दिलेली माहिती

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य केलं होतं, ते चर्चेत आहे. ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी स्वतःहून या योजनेतून नाव काढून घ्यावं. महिलांना आतापर्यंत जेवढी रक्कम देण्यात आली ती परत मागण्यात अर्थ नाही. आतापर्यंत जेवढे हप्ते दिले ते महिलांना अर्पण केलं असं समजू, मात्र ज्या महिला पात्र नाहीत त्यांनी स्वतः हून नावं काढून घ्यावीत, अन्यथा दंडासह वसुली केली जाईल असं म्हटलं होतं

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!