Jobs in TATA: चांगले पद व चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तरुणांसाठी आता एक चांगली अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. टाटटा इंडस्ट्रीमध्ये टाटा अंतर्गत येणाऱ्या सर्व इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये व टीआयएफआरमध्ये आताविविध पदांची पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाईट वरती या संदर्भात नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले असून, पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख या बाबतचा सर्व तपशील देण्यात आलेला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही एक भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाची खास संस्था आहे. यामध्ये युवकांना सरकारी नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. तर यामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा ह्या रिक्त आहेत? याची सविस्तर माहिती जाणून Jobs in TATA
टीआयएफआरमध्ये सायंटिफिक ऑफिसर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सुपरवायझर कॅन्टीन, क्लार्क, वर्क असिस्टंट, प्रोजेक्ट सायंटिफिक, ट्रेड्समन ट्रेनी वेल्डर, अशा इतर जागांचा देखील यामध्ये समावेश आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला मान्यता प्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेमधून आयटीआय, बारावी ग्रॅज्युएशन, बी टेक, बीई, कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स आणि कम्युनिकेशन हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी मध्ये काम केलेले असावे.उमेदवार हा भरतीचा अधिकृत नोटिफिकेशन मध्ये पात्रतेची संबंधित तपशील देण्यात आलेला असावा.
या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा.
टाटा इन्स्टिट्यूटच्या या कंपनीच्या भरतीमध्ये इच्छुक उमेदवाराचे वय हे पदानुसार 28 ते 43 वर्षा दरम्यान असावे. व 1 जुलै 2024 पर्यंत या वयाची गणना केली जाईल. व राखीव प्रवर्गांमधील उमेदवाराला उच्च वयोगटात सवलत दिली जाणार आहे.
उमेदवाराचा पगार
विविध पदांवरती निवड झालेल्या उमेदवाराला त्यांच्या पदानुसार पगार हा 18 हजार 500 ते 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत दिला जाणार आहे.
उमेदवाराची या भरतीसाठी कशी निवड केली जाईल?
लेखी परीक्षा व व्यापार/कौशल्य चाचणी द्वारे उमेदवाराची या भरतीसाठी निवड केली जाणार आहे.
अर्ज हा कोठे करायचा?
अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडून ऑनलाइन तसेच ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना शेवटच्या तारखेपर्यंत अर्जाची हार्ड कॉपी ही संस्थेकडे जमा करावी लागेल. व उमेदवारांनी आपले अर्ज हे प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे पाठवावे लागेल.
अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
या अर्ज प्रक्रिया सुरू झालेले असून, या अर्जाची शेवटची तारीख ही 26 ऑक्टोबर आहे, आणि उमेदवार हा टीआयएफआरच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करू शकतात.