construction workers: आनंदाची बातमी! राज्यातील बांधकाम कामगारांना भेटणार दिवाळीपूर्वी बोनस; मंत्रिमंडळाचा झाला निर्णय! October 16, 2024 by Rushi B WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now construction workers: नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये अनेक योजनांची अंमलबजावणी ही राज्य सरकार करत आहे. व अशातच आता महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या आहेत. व या योजनांमध्ये महिलांना पूर्णपणे लाभ दिला जात आहे, आणि अशातच आता या सरकारने बांधकाम कामगारांना देखील दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला तर मग याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.construction workers: बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. महाराष्ट्र राज्यामधील 54 लाख 38 हजार 585 नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या येत्या देवळी पूर्वी 5 हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. याबाबतची माहिती ही महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती निमंत्रक श्री शंकर पुजारी यांनी दिलेली आहे. बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती शंकर पुजारी हे म्हणाले आहे की, नोंदणीकृत असलेल्या सर्व बांधकाम कामगारांना या दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. महाराष्ट्र भारत व इतर बांधकाम कामगाराला मंडळाकडे जमा असलेल्या कामगार उपकरामधून सुमारे 2719 कोटी 29 लाख रुपये हे सुद्धा देण्यात येणार आहेत. या दिवाळीपूर्वी सर्व बांधकाम कामगारांना बोनस मिळण्याच्या प्रमुख मागणीसाठी 8 ऑक्टोबर 2024 ला कृती समितीने आझाद मैदानावरती आंदोलन देखील केले होते. बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. या बांधकाम कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी या संघटनेच्या शिष्ट मंडळाबरोबर चर्चा सुद्धा केली आहे. बोनस देण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत ही प्रधान सचिवांना दिली. त्यावरती निर्णय करू असे आवाहन हे शिष्टमंडळाला विनिता सिंगल यांनी दिले आहेत. बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच महिन्यापूर्वी बांधकाम मंत्री सुरेश खाडे यांना या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बोनस देण्याचा निर्णय करावा. असे निवेदन पोहोच केले होते. याबाबतही विचार करू, असे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले आहे. तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 5 हजार रुपये बोनस घोषित केलेला होता. परंतु त्यांची अजून अंमलबजावणी शासनाने केलेली नव्हती यामुळे न्यायालयीन प्रक्रियेनंतर 3 वर्षांपूर्वी बांधकाम कामगारांना शासनाने बोनसबाबत निर्णय करावा, असा आदेश दिलेला आहे. बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कल्याणकारी मंडळामधील नोंदणी ही सक्रिय बांधकाम कामगारांना रक्कम 5000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्याबाबतचा निर्णय करण्यात आलेला आहे. 10 ऑक्टोबर 2024 अखेर मंडळामध्ये नोंदीत असलेले 28 लाख 73 हजार 568 व तसेच, मंडळाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी व नूतनीकरणाकरिता प्राप्त झालेल्या 25 लाख 65 हजार 17 अशा एकूण 54 लाख 38 हजार 585 बांधकाम कामगारांना 5000 रुपयांचे अर्थसहाय्यक देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने हाती घेतलेला आहे.
1 thought on “construction workers: आनंदाची बातमी! राज्यातील बांधकाम कामगारांना भेटणार दिवाळीपूर्वी बोनस; मंत्रिमंडळाचा झाला निर्णय!”