Mumbai updates: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्यामधील दरे गावातून रविवारी संध्याकाळी ठाण्यातील आपल्या घरी परतले आहे. त्यांच्या उपस्थितीत सोमवारी सत्तावाटपाचा फॉर्म्युला हा अंतिम केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. चला तर मित्रांनो या बाबतची माहिती आपण जाणून घेऊया.Mumbai updates:
भाजपला पक्षाला 21 मंत्रिपदे व शिवसेनेला 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 11 मंत्रिपदे भेटणार आहेत. मात्र, शिंदे व अजित पवार हे आणखी काही मंत्रिपदे मिळविण्यासाठी प्रयत्नशील व कार्यरत आहेत. तर शिंदेंनी गृह खात्यावर दावा केला आहे. याशिवाय नगरविकास, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, परिवहन, उत्पादन शुल्क, सार्वजनिक बांधकाम व ग्रामविकास आदी महत्त्वाच्या खात्यांसाठी शिंदे हे आग्रही आहेत. भाजप गृह मात्र, खाते सोडण्यास तयार नाही.
अजित पवार हे आता आपले आवडते वित्त खाते मिळावे म्हणून आग्रही आहेत. ते त्यांना देण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीला वित्त खात्यासह सहकार, अन्न व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, महिला व बालविकास, कृषी आदी खाती मिळू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामविकास किंवा सार्वजनिक आरोग्य यापैकी एक खाते मिळावे म्हणून प्रयत्नशील आहे. आता कोणाच्या खात्यात कोणती आणि किती खाती जातात, याबाबत उत्सुकता आहे.
तर, यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार आहे.
पाच डिसेंबरला आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, डॉ. विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा या जुन्या चेहऱ्यांसह डॉ. संजय कुटे, राणा जगजितसिंह पाटील, शिवेंद्रराजे भोसले, किसन कथोरे, राहुल कूल, नितेश राणे, मेघना बोर्डीकर, प्रशांत ठाकूर, रणधीर सावरकर, योगेश सागर अशा काही नव्या आणि तरुण चेहऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांच्यासह दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय राठोड या जुन्या चेहऱ्यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. तर आशिष जयस्वाल, राजेश क्षीरसागर, भरत गोगावले या चेहऱ्यांनाही संधी मिळू शकते. माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांच्या समावेशाबाबत मात्र अनिश्चितता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांसह छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, माणिकराव कोकाटे या नावांचा समावेश होऊ शकतात.
शिंदेंनीच मुख्यमंत्री व्हावे: गुलाबराव पाटील
दरम्यान एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार आहे की नाही याबाबत संभाव्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे यांच्या ऐवजी खासदार श्रीकांत शिंदे, दादा भुसे व शंभूराज देसाई यांच्यापैकी एकाची वर्णी उपमुख्यमंत्रिपदावर लावली जाईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे हे या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी केली. आम्ही शिंदेंची मनधरणी करू व त्यांनाच मुख्यमंत्री करू. ती आमची मागणी मान्य करतील, असे सांगितले आहे.