मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा किती गुरुवार? जाणून घ्या तारखा व पूजा विधी आणि मुहूर्त!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Margashirsha Guruvar 2024: कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष हा महिना सुरु होतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, मार्गशीर्ष हा 9 वा महिना आहे. हिंदू धर्मात 12 महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहेत.मार्गशीर्ष महिन्याला “मागर” किंवा “मार्गशीर्ष स्नानाचा महिना” असेही देखील म्हणतात. या काळात प्रातःकाळी पवित्र नदीत स्नान करून पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या महिन्यात केलेल्या साधनेने, भक्तीने, आणि दानधर्माने विशेष पुण्य प्राप्त होते. म्हणून मार्गशीर्ष महिना हा शांती, समृद्धी आणि भक्तीचा काळ म्हणून ओळखला जातो.Margashirsha Guruvar 2024:

मार्गशीर्ष महिना 2024 प्रारंभ तारीख आणि समाप्ती तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

यंदा मार्गशीर्ष महिना २ डिसेंबर २०२४ पासून सुरु झाला आहे. या महिन्यात 4 मार्गशीर्ष गुरूवार साजरे केले जाणार आहेत. पण यंदा कोणत्या तारखेला गुरुवार असतील तसेच या गुरुवारच्या व्रताचे महत्त्व, पूजा विधी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मार्गशीर्ष महिना 2024 प्रारंभ तारीख आणि समाप्ती तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मार्गशीर्ष गुरुवार 2024 – 25 तारखा

पहिला मार्गशीर्ष गुरुवार – 5 डिसेंबर 2024

दुसरा मार्गशीर्ष गुरुवार – 12 डिसेंबर 2024

तिसरा मार्गशीर्ष गुरुवार : 19 डिसेंबर 2024

चौथा मार्गशीर्ष गुरुवार : 26 डिसेंबर 2024

मार्गशीर्ष गुरुवारचे महत्त्व,

आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्त्वाचे आहे हे भद्रश्रवाराजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीचे मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो.

मार्गशीर्ष महिना 2024 प्रारंभ तारीख आणि समाप्ती तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करायची?

मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक काडून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळ आणि त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशाला हळद-कुंकु लावून आत पाणी, अक्षता, दूर्वा, एक नाणं व सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची पाने, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. यानंतर चौरंगावर अंथरलेल्या लाल कपड्यावर थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलशाची स्थापना करा, आता चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. यानंतर विधीवत पूजा करा, आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवू शकता.

1 thought on “मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा किती गुरुवार? जाणून घ्या तारखा व पूजा विधी आणि मुहूर्त!”

Leave a Comment

error: Content is protected !!