Ladki bahin Yojana: महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नव्याने चर्चेमध्ये आलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात याच योजनेला केंद्रस्थानी ठेवून महायुतीने सरकारने आपला प्रचार केला होता. आणि आता याच योजनेबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे चला तर मग मित्रांनो आपण या योजनेबद्दल आदित्य ठाकरेंनी दिलेले माहिती पाहूया.Ladki bahin Yojana:
आदिती तकटरे यांनी या योजनेबाबत नेमकं काय सांगितलं आहे?
आदिती तटकरे यांनी एबीपी माझाशी बातचित केली. यावेळी बोलताना “लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 2 कोटी 34 लाखाच्या जवळपास महिला लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची स्क्रूटनी होणार नाही. छाननीबाबत चुकीचे वृत्त समोर येत आहे. या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने लाभ मिळालेला आहे. या योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या अर्जाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
या तक्रारीसंबंधित विभाग निर्णय घेईल. पण सध्यातरी अर्जाच्या छाननीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या मी त्या विभागाची मंत्री नाही. मात्र मी जेव्हा मंत्री होते, त्यावेळी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. जे लाभार्थी आहेत, त्यांना योग्य पद्धतीने पैसे देताना याआधीच अर्जाची छाननी करण्यात आलेली आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
अर्जाची छाननी होणार का? नेमकी काय चर्चा आहे?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना निकषात बसत नसूनही प्रतिमहिना 1500 रुपये लाभ दिला जात आहे, अशा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे तक्रार आलेल्या अर्जाची नव्याने छाननी केली जाणार आहे. तसेच अर्जामध्ये तफावत आढळल्यास, चुकीची माहिती दिली गेली असल्यास अर्ज बाद केला जाईल, असे सांगण्यात येत आहे. यासह अर्जदार महिला सरकारने घालून दिलेल्या नियमांत बसत नसेल, तरीदेखील अर्ज बाद केला जाईल, असे सांगितल जात आहे. पण अद्याप तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे आदिती तकटकरे यांनी सांगितले आहे.
याच दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अर्जाची छाननी करण्याचे सूतोवाच केले होते. व तसेच या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ 1500 रुपयांवरून 2100 रुपये केला जाईल, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली होती. सर्व बाबी तपासून आगामी अर्थसंकल्पात त्यासाठीच्या निधीची तरतूद करण्यावर विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस हे म्हटले आहे.
1 thought on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अर्ज छाननी बाबत आदित्य तटकरे यांनी दिली माहिती! पहा काय म्हणाल्या आदित्य तटकरे?”