Viral video: नवीन वर्ष 2025 चे आगमन सर्वच नागरिकांनी उत्साहामध्ये स्वागत केले आहे. जुन्या वर्षांमधील कडू व गोड आठवणींना निरोप देत नवीन वर्षामध्ये प्रवेश केला आहे. नवीन वर्षात तुमच्यापैकी अनेक जण वेगवेगळे संकल्प करत असतात. व त्यामध्ये वजन कमी करणे, योग करणे, बचत करणे, बाहेरचे खाणे टाळणे, वाचन वाढवणे, प्रवास करणे अशा प्रकारचा अनेक संकल्पनांचा सुद्धा समावेश होत असतो. पण अशातच एका तरुणांन नवीन वर्षाच्या मध्य रात्री 12 वाजता त्याने भर रस्त्यामध्ये लोकांच्या गर्दीत असं काही केलं की ते पाहून तुम्हाला सुद्धा हसू येईल, चला तर मित्रांनो आपण यामध्ये पाहूया.Viral video
नवीन वर्षाचा संकल्प असावा तर तो असा,
पुण्यामधील एफसी रोडवर मोठ्या संख्येने तरुणाईने गर्दी मध्ये नवीन वर्षाचे स्वागत केले होते. मात्र, यावेळी जमलेल्या गर्दीमध्ये एक तरुण भाव खाऊन गेला या तरुणांनी भरत गर्दीमध्ये असे काही केले की ते पाहून उपस्थित लोक सुद्धा हसू लागले. या तरुणांना भर रस्त्यामध्ये उभे असलेल्या लोखंडी स्टेजवरच्या अँगल वर जाऊन व्यायाम सुरू केला सर्व जण रात्री 12 वाजता नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना हा तरुण मात्र चक्क व्यायाम करत होता. यामुळे अनेक जण नवीन वर्षाचा संकल्प असावा तर असे म्हणताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पुण्यामधील एफसी रोड पाहू शकता जिथे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने तरुणाई एकत्र आलेले आहेत. फोटो, सेल्फी, व्हिडिओ करताना सुद्धा दिसत आहेत. पण गर्दी इतके आहे की, अनेक जण रस्त्यावरील लोखंडी स्टेजवर उभे आहेत. इतर सर्व नवीन वर्षाच्या जल्लोष यामध्ये रमले असताना या तरुणांना मात्र त्यामधील एका स्टेजवर उभा राहून चक्क व्यायामच सुरू केला आहे. ज्याला पाहून उपस्थित तरुणाई हसत आहे.
मित्रांनो अशा प्रकारे रस्त्यामध्ये जिम कोण करत असतं असा प्रश्न त्यांना पडलाय अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हटले आहे की या भावाने तर 2025 पासूनच जिम सुरू करणार हे फारच मनावर घेतलेल आहे, असं वाटत आहे. पण म्हणूनच तो नवीन वर्षाच्या रात्री 12 वाजता जिम करू लागलेला आहे.
हा व्हिडिओ पाहून एका युजरने लिहिला आहे की भावाला नवीन वर्षाची जिम लावायची आहे. पण दुसऱ्या दिवशी जाग आली तर एका दुसऱ्याने असे लिहिले की पुणे आहे तिथं काही पण होऊ शकते. शेवटी तिसऱ्याने लिहिले की 2025 मध्ये महाराष्ट्र केसरी होणार वाटते, काहींनी अशाच मजेदार कमेंट्स या तरुणाचा व्हिडिओ पाहून केल्या आहेत. तर, अनेकांना या तरुणाचे असे वागणे अजिबात आवडले नाही.