LIC Vima Sakhi Yojana: महिला सक्षमीकरणासाठी सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल; यासाठी केली या योजनेची अंमलबजावणी!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Vima Sakhi Yojana: भारतीय देशातील आयुर्विमा महामंडळाने विशेषता, महिलांसाठी सुरू केलेल्या विमा सखी योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. पहिल्याच महिन्यामध्ये 52 हजार 511 महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली आहे, आणि 27 हजार 695 महिलांना या योजनेचे नियुक्तीपत्र हे देण्यात आलेले आहेत. चला तर मित्रांनो आपण या योजनेबाबतची सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणून घेऊया.LIC Vima Sakhi Yojana

हेही वाचा 👉 जानेवारी महिन्यामध्ये महिलांना निधी हा किती भेटणार? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती!

विमा सखी योजना ही काम कशी करते?

विमा सखी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी सरकारने एका विमा सखीची नेमणूक करण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे, आणि या योजनेच्या अंतर्गत महिलांना कौशल्य विकास डिजिटल साधने व व्यावसायिक मार्गदर्शन सुद्धा दिले जात आहे आणि या योजनेमधूनच तीन वर्षासाठी मासिक मानधनाचा लाभ देखील मिळतो.

हेही वाचा 👉 जानेवारी महिन्यामध्ये महिलांना निधी हा किती भेटणार? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती!

प्रति वर्ष लाभ,

  • पहिल्या वर्षी, 7000 रुपये मासिक
  • दुसऱ्या वर्षी, 6000 रुपये मासिक
  • तिसऱ्या वर्षी, 5000 रुपये मासिक

तर याशिवाय त्यांनी केलेल्या एकूण विमा पॉलिसी वरती अतिरिक्त कमिशन मिळवण्याची संधी देखील महिलांना या योजनेद्वारे मिळते.

हेही वाचा 👉 जानेवारी महिन्यामध्ये महिलांना निधी हा किती भेटणार? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती!

विमा सखी या योजने ची पात्रता निकष.

  • वय 18 ते 70 वर्ष
  • शिक्षण, दहावी पास
  • आर्थिक सक्षमीकरणासाठी उत्सुक महिलांना या योजनेमध्ये सहभागी नोंदवता येईल.

महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल,

एलआयसीच्या या योजनेमुळे महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य व स्वावलंबी बनवण्यासाठी संधी आता मिळत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या दृष्टिकोनामधून साकारलेली ही योजना ग्रामीण व शहरी भागांमधील महिलांना नवी उंची गाठण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

हेही वाचा 👉 जानेवारी महिन्यामध्ये महिलांना निधी हा किती भेटणार? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती!

योजनेच्या भविष्यातील उद्दिष्टे.

एलआयसी ने पुढील तीन वर्षांमध्ये 2 लाख विमा सखींच्या भरती करण्याचा संकल्प हा केलेला आहे, आणि ही योजना महिलांसाठी रोजगार आणि उद्योजकतेच्या नवीन संधी निर्माण करत आहे. तर मित्रांनो इच्छुक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रवासात सामील व्हावे.

(टीप… अधिक माहिती हवी असल्यास आपल्या नजीकच्या एलआयसी कार्यालयाशी संपर्क साधून माहिती मिळवावी.) धन्यवाद!

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “LIC Vima Sakhi Yojana: महिला सक्षमीकरणासाठी सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल; यासाठी केली या योजनेची अंमलबजावणी!”

Leave a Comment

error: Content is protected !!