50% Subsidy On Tractor-driven Threshing Machine: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की सरकार हे आपल्याला शेती कामातील अवजारांसाठी अनुदान देत असते. अशातच सरकारने ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सुद्धा 50 टक्के अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे, आणि आता या सरकारने ट्रॅक्टरचलित मळणीयंत्रासाठी सुद्धा 50 टक्के अनुदान मिळवण्यासाठी घोषणा केली आहे. चला तर मित्रांनो आपण याबाबतची सविस्तर माहिती यामध्ये जाणून घेऊया.50% Subsidy On Tractor-driven Threshing Machine
ट्रॅक्टरचलित मळणीयंत्र मिळवण्यासाठी 50 टक्के अनुदान हे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळवायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो, आणि हा अर्ज कशा पद्धतीने सादर करावा लागतो? याबाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे ती तुम्ही संपूर्ण वाचून पहा.
सध्या शेतीमधील बहुतांश कामे ही ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारेच केले जात आहेत, आणि यामुळे आता शेतकरी बांधवांचा वेळ देखील वाचतो, व कामे देखील जलद गतीने होत जातात. म्हणून तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल, व तुम्ही ट्रॅक्टरचलित मळणे यंत्र खरेदी करण्याच्या तयारीत असताल, तर तुम्हाला आता 50% अनुदान हे मिळणे यंत्र खरेदी करण्यासाठी मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो.
ट्रॅक्टरचलित मळणे यंत्र 50 टक्के अनुदान मिळवण्यासाठी कोठे कराल अर्ज?
या महाडिबीटी पोर्टल वरती मळणी यंत्र अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. ऑनलाइन अर्ज केल्यावरती सदरील योजनेच्या लॉटरीमध्ये लाभार्थ्याचे नाव आले तर त्याल लाभार्थ्याच्या नोंदणीकृत मोबाईल वरती या संदर्भामध्ये एसएमएस पाठवला जातो. आणि युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करता येते. किंवा आधार ओटीपी च्या साह्याने देखील तुम्ही लॉगिन करू शकता. व तसेच शेतकऱ्याची नोंदणी झाली नसेल, तर नोंदणी करून युजर आयडी व पासवर्ड देखील मिळवता येतो.
ट्रॅक्टरचलित मळणी यंत्रासाठी अनुदानाचे स्वरूप,
ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती-जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 0 टक्के अनुदान दिले जाते. किंवा 1.25,000 यापैकी जे कमी असेल ती रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
सर्वसामान्य शेतकऱ्यांना 40% किंवा 1 लाख रुपये यापैकी जे कमी असेल तर अनुदान दिले जाते. व सदरील जी आर बघितल्यावर तुम्हाला ट्रॅक्टरचलित मळणी यंत्र संदर्भामध्ये सविस्तर माहिती मिळू शकेल.
अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा केला जातो यासंदर्भामधील खालील लिंक दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.