Agriculture Land Rule 2025: भारत देशात एक व्यक्ती जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकते? पहा याबाबतचे नियम!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Land Rule 2025: भारत देशामध्ये निम्मेहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व शेतीशी निगडित उद्योग धंद्यावरती अवलंबून आहे. म्हणजेच आता देशांमधील बहुतांशी घरामधील चुली काळयाआईमुळेच पेटत आहेत. पण अलीकडे भारतातील लागवडी खालील क्षेत्र हे थोडेसे कमी झालेले आहेत.Agriculture Land Rule 2025

हेही वाचा 👉 नवरीने गाजवली वरात; स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ पाहून तुम्हीही होताल थक्क!

वाढत्या शहरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे शेती योग्य जमिनी कमी होत आलेल्या आहेत. पण असे असले तरी आजही अनेक जण शेतीयोग्य जमिनी विकत घेताना दिसतात. शेती योग्य जमीनी फक्त शेती करण्यासाठीच विकत घेतल्या जातात असं नाही तर गुंतवणूक म्हणून देखील काही जण शेतजमीन हे विकत घेत असतात.

पण तुम्हाला या भारत देशामधील शेतीविषयक जमिनी खरेदी करण्याचा व विक्री करण्याचा कायदा माहिती आहे का? कारण की आपल्या भारत देशामध्ये एका व्यक्तीला हवी तेवढी शेत जमीन खरेदी करता येत नाही. म्हणजेच एका निश्चित मर्यादेपर्यंतच लोकांना शेतीची जमीन खरेदी करता येते याबाबत भारतामध्ये काही कायदे आहेत. प्रत्येक राज्यामध्ये देखील वेगवेगळे कायदे आहेत.

हेही वाचा 👉 नवरीने गाजवली वरात; स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ पाहून तुम्हीही होताल थक्क!

या दरम्यान आज आपण भारत देशामधील काही प्रमुख राज्यांमधील शेतीविषयक कायद्याचे थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखांमध्ये आज करणार आहोत. आज आपण देशातील प्रमुख राज्यांमध्ये कमाल किती शेती जमीन खरेदी करता येऊ शकते. व महाराष्ट्र राज्यांमध्ये याबाबतचे काय नियम आहेत? याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तर, मित्रांनो कायदा काय सांगतो?

मित्रांनो केरळ राज्यामध्ये 1963 च्या जमीन सुधारणा कायद्यानुसार विवाहित नसलेले व्यक्ती केवळ 7.5 एकरपर्यंत जमीन खरेदी करू शकते. व त्याचवेळी पाच सदस्यांचे कुटुंब 15 एकरपर्यंत जमीन खरेदी करू शकत, आणि पश्चिम बंगालमध्ये जास्तीत जास्त 24.5 एकर जमीन खरेदी करता येते, तर हिमाचल प्रदेशांमध्ये 32 एकर जमीन खरेदी करता येते.

तुम्ही जर कर्नाटक मध्ये 54 एकर जमीन खरेदी करू शकतात. पण तेथे फक्त शेतकऱ्यांना जमीन खरेदी करता येते उत्तर प्रदेशांमध्ये एक व्यक्ती जास्तीत जास्त 12.5 एकर शेती योग्य जमीन खरेदी करू शकते. बिहार राज्यामध्ये शेती किंवा बिगर शेती जमीन फक्त 15 एकरापर्यंतच खरेदी करता येते. गुजरात राज्यामध्ये शेतीची जमीन फक्त शेतकऱ्यांनाच खरेदी करता येते. आता आपण महाराष्ट्र राज्यामध्ये याबाबतचे काय नियम आहेत ते पाहूयात.

हेही वाचा 👉 नवरीने गाजवली वरात; स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ पाहून तुम्हीही होताल थक्क!

महाराष्ट्र राज्यामध्ये कसे आहेत नियम?

राज्यामध्ये फक्त शेतकऱ्यांना शेती योग्य जमीन खरेदी करता येऊ शकते ज्या लोकांच्या नावावर सातबारा आहे अशा लोकांनाच आपल्या राज्यामध्ये शेतीची जमीन खरेदी करता येऊ शकते. राज्यातील सिलिंग कायदा हा अस्तित्वात आहे आणि या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 12 महीने पाणीपुरवठा किंवा बागायत जमीन असल्यास फक्त 18 एकर तेवढी जमीन खरेदी करता येऊ शकते.

12 महिने पाणीपुरवठा नसलेली पण वर्षांमधून एका पिकासाठी खात्रीचा पाणीपुरवठा असलेली 27 एकर ही जमीन खरेदी करता येऊ शकते. व तसेच हंगामी बागायत किंवा भात शेतीची जमीन असेल, तर एका शेतकऱ्याला कमाल 36 एकर एवढी जमीन खरेदी करता येऊ शकते आणि कोरडवाहू जमीन असेल, तर एका शेतकऱ्याला कमाल 54 एकर एवढी जमीन खरेदी करता येऊ शकते.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!