1) किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली: किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाखांवरून वाढवून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेताना मोठा फायदा होणार आहे.
हेही वाचा 👉 पीक विमा योजनेअंतर्गत तुमच्या पीक विम्याची स्थिती कशी तपासायची? दोन मिनिटात जाणून घ्या!
2) युरिया उत्पादनात आत्मनिर्भरता: युरिया उत्पादनात आत्मनिर्भरता आणण्यासाठी ईशान्य भारतात तीन नवीन कारखाने सुरू करण्यात येणार आहेत. या कारखान्यांची उत्पादन क्षमता १२.७ लाख मेट्रिक टन इतकी असेल.
3) प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना: ही योजना राज्य सरकारांच्या सहाय्याने राबवण्यात येणार आहे. १०० जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून १.७ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
4) डाळींसाठी ६ वर्षांची आत्मनिर्भरता योजना: डाळींच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी ६ वर्षांची आत्मनिर्भरता योजना सुरू करण्यात येणार आहे.
5) फळ-भाजीपाला उत्पादकांसाठी विशेष योजना: फळ आणि भाजीपाला उत्पादकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहे.
हेही वाचा 👉 पीक विमा योजनेअंतर्गत तुमच्या पीक विम्याची स्थिती कशी तपासायची? दोन मिनिटात जाणून घ्या!
6) बिहारमध्ये मकाना बोर्ड: बिहारमध्ये मकाना बोर्डची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
7) समुद्रातून मासेमारीचे शाश्वत संकलन: अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर लक्ष केंद्रित करून समुद्रातून मासेमारीचे शाश्वत संकलन करण्यात येणार आहे.
8) कापूस उत्पादकतेसाठी ५ वर्षांचे अभियान: कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी ५ वर्षांचे अभियान सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष योजना राबवली जाणार आहे.
9) कृषी क्षेत्राला आत्मनिर्भरतेकडे नेण्यावर भर: कृषी क्षेत्राला आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
हेही वाचा 👉 पीक विमा योजनेअंतर्गत तुमच्या पीक विम्याची स्थिती कशी तपासायची? दोन मिनिटात जाणून घ्या!
10) कापसाच्या विविध जातींचा विकास: कापसाच्या विविध जाती विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस उत्पादनाला चालना देण्यात येणार आहे.
1 thought on “Budget 2025: अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय मिळालं? सरकारने केल्या 10 महत्त्वाच्या घोषणा; पहा सविस्तर माहिती!”