Cowshed Grant: नमस्कार शेतकरी मित्रांनो गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गाईंच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन प्रतिघात पन्नास रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहेत, आणि या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाकडून नोंदणीकृत्व सदर शासन निर्णयामधील नमूद निकषानुसार पात्र गोशाळा व सदन, पांजरापोळ आणि गोरक्षण संस्थांनी 5 जानेवारी 2025 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. असे आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन उप आयुक्तालय डॉक्टर विश्वास येवले यांनी केलेले आहे. चला तर मित्रांनो या बाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.Cowshed Grant
मित्रांनो या योजनेचा उद्देश व स्वरूप, अनुदान, पात्रतेच्या अटी व शर्ती या योजनेची अंमलबजावणी आणि तसेच या योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे, इत्यादी बाबींची सविस्तर माहिती आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
या योजनेची स्वरूप, उद्देश, अनुदान, अटी, शर्ती व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे इत्यादी बाबींची माहिती www.mahagosevaayog.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
8 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयामधील नमूद पात्रतेच्या अटीनुसार इच्छुक पात्र संस्थांनी ऑनलाइन पद्धतीने विहित नमुन्यामधील अर्ज उपरोक्त संकेतस्थळावर 5 जानेवारीपर्यंत ऑनलाईन सादर करावे, अशी विनंती केलेली.
राज्यातील गोसेवा आयोग कार्यालयाकडे थेट प्रस्ताव सादर केलेला आहे. व तसेच ई-मेल किंवा तत्समद्वारे सादर केलेल्या अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर येवले यांनी केलेले आहेत.