महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार, व मोठा निर्णय जाहीर करणार!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Eknath Shinde: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत. अत्यंत प्रचंड आणि घवघवीत यश महायुतीला मिळालं आहे. मागच्या तीन दशकात एकाही युती किंवा आघाडीला असं यश मिळवता आलं नव्हतं. २३ नोव्हेंबरच्या या निकालावर विरोधकांनी काही प्रमाणात संशय व्यक्त केला आहे. मात्र आता महायुतीसमोरचा पुढचा पेच आहे मुख्यमंत्री कोण? चला तर या लेखामध्ये जाणून घेवू.Eknath Shinde:

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन भाजपा व शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पेच..

महायुतीत भाजपाला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाला सलग तिसऱ्यांदा १०० पार जागांचं यश मिळालं आहे. त्यांच्या नावे हा रेकॉर्डच तयार झाला आहे. तर एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde ) शिवसेनेला ५७ आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवारांच्या ४ अशा ६१ जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री या पदावर दावा सांगितलेला नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आमची काही हरकत नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीने म्हटलं आहे. तर संघानेही देवेंद्र फडणवीस यांच्या नावालाच अनुमोदन दर्शवलं आहे. दुसरीकडे शिवसेनेची मागणी वेगळी आहे.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मागणी काय?

महाराष्ट्रात महायुतीला जे यश मिळालं ती विधानसभा – निवडणूक एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वात लढवण्यात आली होती. त्यामुळे महायुतीने आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून होते आहे. महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवला जावा अशी मागणी शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्रिपदाचं काय होणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यावर काय होईल?

एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर १४ वी विधानसभा बरखास्त होईल. १५ वी विधानसभा स्थापन होईल आणि राज्यपाल महायुतीला नेता निवडण्याबाबत सूचना देतील तसंच सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देतील. या सगळ्या घडामोडी घडेपर्यंत जो कालावधी जाईल त्या कालावधीत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य काय आहे?

महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील.

Leave a Comment

error: Content is protected !!