Golden price today: गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण होताना आपल्याला पहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभरात सोनं हे साधारण 3,710 रुपयांनी स्वस्त झालं आहे. देशाची राजधानी दिल्लीचा विचार करायचा झाल्यास 17 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 75,800 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यामुळे आता कोणत्या शहरात सोन्याचा भाव किती आहे? व तसेच सोन्याच्या भावात घट नेमकी का होत आहे? ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.Golden price today:
मनीकंट्रोल या वृत्तविषय संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली या शहरात 24 कॅरेट सोन्याची किंमत ही 75,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर याच शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 69,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मुंबई व कोलकाता या शहरांत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 75,650 रुपये तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 69,350 रुपये होता.
चेन्नई या शहरांमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,600 रुपये होता. भोपाळ व अहमदाबाद या शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,700 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ या शहरामध्ये 24 कॅरेट असलेल्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 75,800 रुपये होता. जयपूर व चंडीगडमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव लखनौप्रमाणेच होता.
अमेरिका देशातील फेडरल रिझर्व्ह बँकेने सलग FOMC बैठकीत व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे रुपयाच्या तुलनेत डॉलर हा मजबूत झाला आहे.
याचाच परिणाम सोन्यावर होतोय. सोन्याचा भाव कमी होताना देखील दिसतोय. जागतिक सोने बाजारात सोन्याचा भाव 2,570.10 डॉलर प्रति औंस आहे. गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याचा दर 2622.45 डॉलर प्रति औंस होता.
2 thoughts on “नागरिकांसाठी खुशखबर! 7 दिवसांत सोनं तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त; 10 ग्रॅमसाठी किती पैसे द्यावे लागणार?”