Ladki Bahin update: राज्यातील लाडक्या बहिणींना एकनाथ शिदेंकडुन आनंदाची बातमी; पहा योजनेबाबतची माहिती! December 22, 2024 by Rushi B WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin update: नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर आता माहीतच आहे, की महाराष्ट्र सरकार हे महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहेत. आणि खास करून महिलांसाठी राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, आणि या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मानधन दिले जात आहे. व ही योजना महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अंमलात आणलेली आहे. चला तर मित्रांनो या योजनेची माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.Ladki Bahin update लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा. महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेची घोषणा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बैंक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. आतापर्यंत या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पाच हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता लाभार्थी महिलांसह सर्वांचं लक्ष डिसेंबर महिन्याचा हप्ता हा बँक खात्यात कधी जमा होणार याकडे लागलं आहे. लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा. विधानसभेच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजना प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनलेली होती. या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली, तर सत्ताधाऱ्यांनी देखील तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं. दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. तर दुसरीकडे आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं महायुतीच्या सरकारने आश्वासन दिलं होतं. आता राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे 2100 रुपये कधीपासून मिळणार, याकडे देखील सर्वांच लक्ष लागलं आहे. पुढील अजून काही महिने लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपयेच जमा होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये मिळू शकतात. अशी माहिती समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा. याच, दरम्यान डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं असतानाच, आता मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे. ही योजना कधीही बंद पडणार नसून, चालूच राहणार आहे. डिसेंबर महिन्याचे पैसे देखील याच महिन्यात मिळणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे. अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.