Ladki Bahin Update: राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत, आणि या योजनेच्या अंतर्गत अपात्र लाडक्या बहिणींना आपले अर्ज स्वतःहून मागे घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहेत. निकषात न बसणाऱ्या महिलांनी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होताच वेळेमध्ये आपला अर्ज मागे घेतला नाही, तर त्यांना मिळालेली रक्कम ही परत करून त्यांच्यावर दंड आकारला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.Ladki Bahin Update
महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे, की अपात्र महिलांनी स्वतःहून या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधली आपली नावे कमी करावीत किंवा महिला व बालविकास विभागाच्या लेखाशीर्षावर संबंधित रक्कम जमा करावी.
अपात्र महिलांसाठी दंडाची केली तरतूद,
मीडिया रिपोर्टर नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असणाऱ्या काही लाभार्थी महिलांनी स्वयंस्फुर्तीने अर्ज मागे घेतले आहेत. या योजनेमध्ये अपात्र महिलांनी स्वतःहून आपले नाव बाद केले नाही तर दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलेले आहे.
महिला व बालकल्याण विभागाची भूमिका काय आहे?
मित्रांनो महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की, सध्या आलेल्या या तक्रारीच्या आधारावर अर्जाची तपासणी ही सुरू आहे. पण काही काळामध्ये सर्व अर्जाची तपासणी ही पूर्णपणे केली जाईल. तरीही ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत, त्यांनी स्वतःहून आपले अर्ज मागे घेणे हे अति महत्त्वाचे ठरेल.
डिसेंबर या महिन्याचा लाभ व पुढील प्रक्रिया.
महिलांना डिसेंबर या महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे. व जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आता राज्यातील या पात्र महिलांना सुरू आहे. मात्र या योजनेच्या अंतर्गत अपात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे.
तर याबाबत सावधानतेचे आव्हान,
मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांना आव्हान केले आहे, की लाभ घेण्यासाठी सर्व निकष अपूर्ण आवश्यक आहे, अन्यथा अपात्र लाभार्थ्यांनी विरोधात करत कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांसाठी महत्त्वाची असून, या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा यासाठी या राज्य सरकारने कठोर पावले उचलले आहेत. अपात्र लाभार्थ्यांनी अर्ज मागे घेऊन सहकार्य करावे. अन्यथा दंडाची कारवाई करण्यात येईल. असं या राज्य सरकारने म्हटले आहे.
येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
1 thought on “Ladki Bahin Update: लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांसाठी दंडाची तरतूद; महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती!”