Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा लागेल; आली मोठी बातमी समोर, पहा काय आहे निकष!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांसाठी आता मोठी बातमी समोर आलेली आहे. जर तुमच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहने असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही. शासनाने या नव्या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला असून, 4 तारखेपासून अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका या घरोघरी जाऊन याची चौकशी व पडताळणी करणार आहेत.Ladki Bahin Yojana

हेही वाचा 👉 अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय मिळालं? सरकारने केल्या 10 महत्त्वाच्या घोषणा; पहा सविस्तर माहिती!

चार चाकी वाहन असलेल्या महिलांना या योजनेमधून वगळण्याचा अंदाज,

मित्रांनो पुणे जिल्ह्यामधून तब्बल 21 लाख 11,999 महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केलेले होते. पण, मात्र या राज्य शासनाने चार चाकी वाहन असलेल्या अर्जदारांना या योजनेमधून अपात्र घोषित करण्याचे ठरवले आहे. महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर. अनुप कुमार यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या बैठकीमध्ये राज्यामधील अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. परिवहन विभागाच्या मदतीने वाहनधारकांची यादी तयार करून, जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेली आहेत.

कोणत्या तपासणीशिवाय अर्ज हे मंजूर केले जात होते?

विधानसभा निवडणुकीपूर्वी या महायुती सरकारने या योजनेसाठी कोणत्याही तपासणीशिवाय अर्ज मंजूर केलेले होते. पण, आता मात्र पात्रता निकष तपासले जात असून, चार चाकी वाहन धारक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. पुणे जिल्ह्यामध्ये अजूनही 4800 अर्जांची छाननी बाकी आहे. व त्यासाठी 4 फेब्रुवारी अखेरची मुदत आहे.

हेही वाचा 👉 अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय मिळालं? सरकारने केल्या 10 महत्त्वाच्या घोषणा; पहा सविस्तर माहिती!

अंमलबजावणी कशाप्रकारे होणार?

राज्य शासनाच्या आदेशानुसार, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका व बालविकास प्रकल्प अधिकारी हे महिलांच्या घरोघरी जाऊन पूर्णपणे पडताळणी करतील. चार चाकी वाहन असलेल्या अर्जदारांची नावे शासनाकडे पाठवले जातील. व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जमसिंग गिरासे यांनी सांगितले आहे की, शासनाने दिलेल्या निकषांची आम्ही तात्काळपणे अंमलबजावणी करत आहोत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी आवश्यक निकष कोणते?

  • लाभार्थी महिलेचे वय हे 18 ते 65 वयाच्या दरम्यानच असावे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या आत मध्ये असावे.
  • कुटुंबामधील कोणताही सदस्य हा सरकारी नोकरीत नसावा व तसेच प्राप्तीकर भरणारा नसावा.
  • संजय गांधी निराधार या योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेली लाभार्थी महिला नसावी.
  • कुटुंबामधी चारचाकी वाहन असल्यास अर्जदार हे अपात्र ठरले जातील.

लाभार्थी महिलांचे महत्त्व संभाव्य परिणाम

महिला वर्गामधून या निर्णयावर समिश्र प्रतिक्रिया उपटत आहे. काही शासणाच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे, तरी अनेक महिलांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. व त्यांचे म्हणणे आहे की, या घरामध्ये चारचाकी वाहने असणे म्हणजे श्रीमंत आसणे नव्हे. अनेक वेळा वडिलांच्या नावावर किंवा भावाच्या नावावर गाडी असते, पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी चांगली नसते.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा लागेल; आली मोठी बातमी समोर, पहा काय आहे निकष!”

Leave a Comment

error: Content is protected !!