Land NA Record: राज्य सरकारचा मोठा निर्णय; जमीन NA करण्याच्या प्रक्रियेमध्ये झाले मोठे 3 बदल, वाचा सविस्तर!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land NA Record: मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही एनए हा शब्द ऐकला असेल, असं अजिबातच होणार नाही. पण, एनएची प्रक्रिया ही किचकट असते, व वेळखाऊ देखील असल्याची तक्रार ही वारंवार सामान्य नागरिकांकडून केली जात आहेत. चला तर मित्रांनो आपण आज या एनए बद्दल माहिती या लेखांमध्ये जाणून घेऊया.Land NA Record

हेही वाचा 👉 आज सोन्याच्या दारात झाली मोठी घसरण; 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय आहे? पहा याबाबत माहिती!

जर एखाद्या जमीनीचा एनए करायचा म्हटल्यावर त्यासाठी वेगवेगळ्या विभागाकडून न हरकत हे प्रमाणपत्र घ्यावे लागत असते. आणि आता यासाठी बराच वेळ लागायचा पण त्यामुळे या एनएची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासन स्तरावर गेल्या काही वर्षापासून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत.

तर मित्रांनो याचाच भाग म्हणून जमीन एनए करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. त्यासाठी महसूल कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली असून, हे एनए म्हणजे नेमकं काय, ते का करतात? जमीन एनए करण्यासाठी अर्ज हा कुठे व कसा करायचा? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात व येण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत? याची सविस्तर माहिती या लेखात पहा.

हेही वाचा 👉 आज सोन्याच्या दारात झाली मोठी घसरण; 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय आहे? पहा याबाबत माहिती!

एनए म्हणजे काय, एनए का करावा लागतो?

मित्रांनो सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर हा शेतीसाठी केला जातो. पण जमिनीचा वापर हा बिगर शेतीसाठी म्हणजेच औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. या प्रक्रियेला म्हणजेच शेतीच्या जमिनीचं बिगर शेतीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेलाच एनए असं म्हणतात. व तसेच याला नॉन एग्रीकल्चर किंवा अकृषीक असे देखील म्हणतात.

हेही वाचा 👉 आज सोन्याच्या दारात झाली मोठी घसरण; 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय आहे? पहा याबाबत माहिती!

या रूपांतराच्या प्रक्रियेसाठी ठराविक रूपांतर कर हा आकारला जातो. शिवाय, या राज्यामध्ये तुकडे बंदी कायदा लागू आहे. त्यामुळे मग तुमच्या जिल्ह्यामध्ये तुकड्याचे जे प्रमाणभूत क्षेत्र आहे, त्यापेक्षा कमी क्षेत्राचा जमिनीचा तुकडा हा खरेदी विक्री करता येत नाही. तो विकायचा असेल, तर त्याचा एनए लेआउट करूनच तो विकावा लागतो. मंग त्यामुळे एनएच्या प्रक्रियेला फार महत्त्व दिले जात आहे.

एनए करण्यासाठी अर्ज हा कुठे करायचा?

मित्रांनो जर तुम्हाला जमिनीचा एनए करायचा असेल, तर त्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. आणि या अर्जासोबत काही कागदपत्रे देखील जोडावी लागतात. यामध्ये सामान्यपणे जमिनीचा सातबारा उतारा, सातबारा संबंधित फेरफार, मिळकत पत्रिका, प्रतिज्ञापत्र, ज्या जमिनीचा अकृषिक म्हणून वापर करायचा आहे, त्या जमिनीचा चतुर सीमा दर्शवणारा नकाशा, संबंधित जागेचा सर्वे किंवा गट क्रमांक नकाशा, आर्किटेक्ट तयार केलेल्या बांधकाम लेआउटच्या प्रति एवढ्या कागदपत्रांचा समावेश लागतो.

या कागदपत्रांसोबतच अर्ज तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला जमा करावा लागतो, आणि महसूल तज्ञ डॉक्टर संजय कुंडेटकर यांच्या महसुली कामकाज पुस्तिका या पुस्तकांमध्ये या अर्जासाठीचा नमुना देण्यात आलेला आहे. त्यासाठी तुम्ही तहसीलदाराकडे कागदपत्रांसहित अर्ज करू शकतात.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “Land NA Record: राज्य सरकारचा मोठा निर्णय; जमीन NA करण्याच्या प्रक्रियेमध्ये झाले मोठे 3 बदल, वाचा सविस्तर!”

Leave a Comment

error: Content is protected !!