Maharashtra Drone Yojana: सरकारकडून शेतकऱ्यांसाठी भेटणार ४ लाख रुपयांचे अनुदान, जाणून घ्या अर्जाची सविस्तर प्रक्रिया!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Drone Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे! महाडीबीटी ड्रोन अनुदान योजना २०२४-२५ अंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या वेळ, श्रम, आणि खर्चात बचत होऊन राज्यातील शेतकऱ्यांना आता आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे.Maharashtra Drone Yojana

योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

ड्रोनच्या उपयोगाचे फायदे काय आहेत?

तर या ड्रोनचा उपयोग पिकांवर कीटकनाशके, खते व सूक्ष्म मूलद्रव्ये फवारणीसाठी करता येतो. याशिवाय, ड्रोनमुळे रोग प्रतिबंध, माती परीक्षण, व पाण्याचे नियोजन करणे सोपे झाले आहे. शेतकरी स्वतः ड्रोनच्या मदतीने फवारणी करू शकतात किंवा प्रशिक्षित व्यक्तींमार्फत है काम करून घेऊ शकतात.

योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

योजनेची वैशिष्ट्ये व पात्रता काय आहे ते पहा.

शेतकरी उत्पादक कंपनी आणि सहकारी संस्थाः ४०% म्हणजेच ४ लाख रुपये अनुदान.

महिला शेतकरी, अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी आणि कृषी पदवीधरः ५०% म्हणजेच ५

लाख रुपये अनुदान.

सर्वसामान्य शेतकरीः ४०% म्हणजे ४ लाख रुपये अनुदान,

अनुदानाची रक्कम मूळ किंमतीच्या ४०% किंवा ५०% असेल, जे कमी असेल ते लागू होईल.

अर्ज हा कशा प्रकारे करावा?

  • अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer) ऑनलाइन करण्यात आली आहे.
  • अर्ज करताना आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवा.
  • अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.

ड्रोन खरेदीसाठीचे महत्वाचे फायदे पहा.

या ड्रोनच्या उपयोगामुळे कीटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचतो, शिवाय खर्चात बचत होते. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतक-यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!