Maharashtra Weather Update: महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका गेल्या काही दिवसापासून वाढलेला आहे. तापमानाचा पारा 10 अंशापर्यंत खाली घसरला असून अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी आहे. व हवामान विभागाने ऐन हिवाळ्यामध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे. काही भागांमध्ये तापमान वाढण्याची दाट शक्यता आहे. तर कोकण मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्र राज्यांमध्ये देखील अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वतवलेला आहे.Maharashtra Weather Update
या हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार उत्तर कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. थंडी कमी होऊन तापमानामध्ये वाढ होईल असा अंदाज या हवामान विभागाने वर्तवलेला आहे. काही दिवसांमध्ये तापमान दोन ते तीन अंशानी वाढ होईल, तर विदर्भामध्ये पुढील पाच दिवस वातावरण कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने देखील वर्तवली आहे. व इतर काही भागांमध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाच्या सरासरींची शक्यता आहे.
येत्या दोन दिवसांमध्ये अकोला, मुंबई, रत्नागिरी ते सिंधुदुर्ग वगळता बहुतांश जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती असुन राजस्थान परिसरामध्ये चक्रकार वारे वाहत आहेत. तर वायव्य भारतामध्ये पश्चिमेकडून जोरदार वारे वाहत असून, काही राज्यांमध्ये थंडीची लाट आहेत. तर काही राज्यांमध्ये दाट धुके पसरलेले आहेत.
धुळे जिल्ह्यामधील शुक्रवारी 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. तर काही अनेक ठिकाणी 10 अंशापर्यंत पारा खाली घसरलेला होता, पण आज राज्यातील किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअस इतके वाढवण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानाची शक्यता असून, हलक्या सरींची शक्यता या हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
1 thought on “Maharashtra Weather Update: हवामान विभागाचा अलर्ट जारी; राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊसाचे वातावरण, पहा कोणत्या भागात होणार पाऊस!”