Majhi Ladki Bahin Yojana: पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यात या दिवशी जमा होणार 2100 रुपये; पहा लाभार्थी यादीत नाव!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. आता याच संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांसाठी आर्थिक मदत म्हणून सरकारकडून दरमहा 1500 रुपये दिले जातात. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सहा हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.Majhi Ladki Bahin Yojana

हेही वाचा 👉 सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण; पहा आजचे नवीन दर काय आहे ते!

सातव्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार?

लाडकी बहीण योजना अंतर्गत डिसेंबर महिन्यापर्यंत महिलांना एकूण 9000 रुपये मिळाले आहेत. यानंतर महिलांना जानेवारी महिन्यांच्या पैशाची प्रतीक्षा लागली आहे. हे पैसे देखील लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळाला आहे. जानेवारी चे पैसे देखील येत्या 26 जानेवारी च्या आधी लाडक्या बहिणींना मिळतील अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होतील असा अंदाज प्रसार माध्यमाद्वारे वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा 👉 सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण; पहा आजचे नवीन दर काय आहे ते!

दरम्यान आमचं सरकार आल्यानंतर आम्ही महिलांना 1500 रुपया एवजी 2100 रुपये देऊ असे आश्वासन माहितीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारावेळी करण्यात आले होते. त्यामुळे आता महिलांना एक विषय रुपये कधीपासून मिळणार पाकडे सर्वांचे लक्ष लागते जाते. याबाबत बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मोठी अपडेट दिली आहे.

हेही वाचा 👉 सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण; पहा आजचे नवीन दर काय आहे ते!

लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये याप्रमाणे पैसे येणार आहेत असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील महिलांना जे जाश्वासन दिले होते ते सर्व आश्वासन आम्ही लवकरच पूर्ण करू, या योजनेमुळेच महिलांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या सरकारला मोठे यश मिळवून दिले आहे. त्यामुळे लवकरच आता त्यांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 2100 रुपये याप्रमाणे पैसे जमा होताना तुम्हाला दिसतील असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

दरम्यान महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार यावर बोलताना मंत्री अदिती तटकरे यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पांमध्ये याबाबत निर्णय घेतला जाईल आणि अर्थसंकल्पानंतर महिलांना 2100 रुपये मिळण्यास सुन्यात देखील होईल असे मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले होते. त्यामु‌ळे महिलांना दरमहा 2100 रुपये मिळवण्यासाठी आणखीन काही महिने वार पहावीच लागणार आहे.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!