Majhi Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर आता माहीतच आहे, की महाराष्ट्र सरकार हे महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहेत. आणि खास करून महिलांसाठी राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, आणि या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मानधन दिले जात आहे. व ही योजना महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अंमलात आणलेली आहे. चला तर मित्रांनो या योजनेची माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.Majhi Ladki Bahin Yojana
ज्या महिलेच्या कुटुंबांचं वार्षिक उपत्न हे 2.50 लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा यासाठी हि लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत एकूण सहा हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. नुकताच डिसेंबरचा हप्ता देखील लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला.
जर आमचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही महिलांच्या खात्यात 2100 रुपये दर महिन्याला जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती, त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र त्यापूर्वी महत्त्वाची बातमी समोर आली ती म्हणजे, ज्या महिला निकषात बसणार नाही, आणि त्यांची जर तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची परत पडताळणी होणार आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच माहिती दिलेली आहे.
ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या महिलेच्या मालकीची कार आहे. तसेच ज्या लाभार्थी महिलेचं आधार कार्डला एक नाव आणि बँक खात्यामध्ये दुसरं नाव आहे, अशा महिलांची तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पडताळणी होईल, मात्र जीआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही असं तटकरे यांनी म्हटलं होतं. तटकरे यांच्या या माहितीनंतर योजनेबाबत चर्चेला उधाण आलं होतं. अखेर यावर आता विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोन्हे यांनी मोठी अपडेट दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या निलम गो हे?
लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे. सरकारने कोणत्याही नियमात बदल केलेला नाही, सर्व पात्र महिलांना शेवटपर्यंत हि योजना लागू राहणार आहे, असं निलम गोन्हे यांनी म्हटलं आहे.
मार्च महिन्यापर्यंत 2100 रुपये मिळण्याची शक्यता,
दरम्यान 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे आता सर्वच महिलांचे लक्ष लागलेले आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या संदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद केली जाण्याची शक्यता आहे, त्यानंतर लाभार्थी महिलांना 2100 रुपये मिळू शकतात.
1 thought on “Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी या योजनेतील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा, योजनेबाबत नवी अपेडट काय?”