Mini Tractor Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता या केंद्र व राज्य सरकारच्या वतीने मिनी ट्रॅक्टर योजना जाहीर केले आहे, आणि या केंद्र व राज्य सरकार आता शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी त्यांना मदत व्हावी या उद्देशाने विवेक शेतकरी योजना राबवत आहे. महाराष्ट्र सरकारने आता 90% अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर योजना सुरू केलेली आहे. चला तर मित्रांना याबाबतचे सविस्तर माहिती आपण यामध्ये जाणून घेऊया.Mini Tractor Yojana
अनुसूचित जाती 90 समाजामधील घटक असलेल्या लोकांना व त्याचप्रमाणे या घटकांमधील बचत गटांना अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर व त्यावर आधारित उपसाधने या सरकारी अनुदानामधून दिले जाते. या मिनी ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन या शासनाकडून नागरिकांना करण्यात आलेले आहेत.
2000 या संदर्भात 2017 च्या शासकीय जीआर नुसार राज्यांमधील अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांमधील बचत गटांना 90% अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर योजना व त्याचे उत्पादने दिली जाते. यात प्रकल्प खर्च साडेतीन लाख रुपये मानूण शासन 3 लाख 15 हजार रुपयांचे अनुदान बचत गटांना देत आहे. एकूणच या योजनेमध्ये 90% शासकीय अनुदान मिळते. नुकतेच यासाठी ऑनलाईन प्रणालीने अर्ज करण्याची आव्हाने या राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर अशा प्रकारे निवड केली जाते.
- सर्वात अगोदर अर्जदाराला संपूर्ण व अचूक माहिती भरावी लागेल, आणि मग विभागाच्या वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल.
- अर्जदाराने सादर केलेला अर्ज वैद्य असल्यास, या अर्जाची झेरॉक्स प्रिंट सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करून ऑनलाईन सादर करावे लागेल.
- उद्दिष्टापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सर्व वैद्य अर्जामधून लॉटरी द्वारे लाभार्थ्याची निवड केली जाते. व त्यानंतर बिलाची पावती सादर करावी लागते.
- लाभार्थ्यांनी खरेदी केलेले साहित्य व वाहन याची पावती ऑनलाईन सादर करावी लागणार.
- ठेव पावती मध्ये जीएसटी क्रमांक, खरेदी क्रमांक, खरेदीची तारीख, वाहन चेसिस क्रमांक, उपकरणे क्रमांक इत्यादी सह विक्रेतेचा तपशीलवार तपशील असावा.
यासाठी वाहन परवाना सादर करणे बंधनकारक आहे.
या मिनी ट्रॅक्टर योजनेंतर्गत, लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या वाहनांसाठी आरटीओमार्फत वाहन परवाना ऑनलाइन सादर करावा लागेल. व वाहन परवान्याची मूळ प्रत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे.
मिनी ट्रॅक्टर सबसिडी (मिनी ट्रॅक्टर सबसिडी योजना) साठी आवश्यक कागदपत्रे.
अनुदानावर मिनी ट्रॅक्टरसाठी येथे अर्जाची स्थिती तपासा.
अनुदानासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना विभागाच्या वेबसाईट वरती अर्ज केल्यावर त्यांनी केलेल्या अर्जाची स्थिती तपासावी लागेल. कारण, शासनाकडून दरवर्षी नवीन उद्दिष्टांसह अर्ज मागवले जातात. सोबतच अर्ज करण्यास इच्छुक शेतकरी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याशीही संपर्क साधू शकतात.
1 thought on “Mini Tractor Yojana: मिनी ट्रॅक्टर साठी आता भेटणार 90% अनुदान; जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती!”