राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी खास बातमी, तरच भेटतील वर्षभरात 3 मोफत गॅस सिलेंडर!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Annapurna Yojana News: नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक प्रकारच्या योजना हे राज्य सरकार राबवत आहे. व या योजनांची अंमलबजावणी देखील करीत आहे. अशातच, आता महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी खास करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राबवलेली आहे.व या योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोफत गॅस सिलेंडर देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. चला तर मग याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.Mukhymantri Annapurna Yojana News:

महिलांना पीएम उज्वला योजनेअंतर्गत मिळणार, मोफत गॅस सिलेंडर असा करा अर्ज!

राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची सुरुवात करून पीएम उज्वला योजनेच्या व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिलांना वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा ही महाराष्ट्र राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली होती. महाराष्ट्र सरकारने पूर्वीच्या आदेशामध्ये आता सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर याचा फायदा महाराष्ट्र राज्यातील कोट्यावधी महिलांना होणार आहे.

महिलांना पीएम उज्वला योजनेअंतर्गत मिळणार, मोफत गॅस सिलेंडर असा करा अर्ज!

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना व मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे, व त्यामधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू होऊन व मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे.

महिलांना पीएम उज्वला योजनेअंतर्गत मिळणार, मोफत गॅस सिलेंडर असा करा अर्ज!

त्यामधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू होऊन या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 2 कोटी 30 लाखांहून अधिक पात्र महिलांना जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्यांचा एकत्रित लाभ देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ भेटण्यासाठी गॅस कनेक्शन संबंधित महिलेच्या नावावरती असण्याची अट ही राज्य सरकारकडून घालण्यात आलेली आहे. तर ही योजना आता महिलांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. या योजनेपासून अनेक महिलांना वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारकडून या योजनेच्या नियमांमधे बदल करण्यात आलेले आहेत.

महिलांना पीएम उज्वला योजनेअंतर्गत मिळणार, मोफत गॅस सिलेंडर असा करा अर्ज!

महाराष्ट्र राज्यातील अनेक कुटुंबातील गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावावर असते. यामुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असूनसुद्धा महिलांना या योजनेचा लाभ मिळवण्यात अडचण भासत होती. पण आता महाराष्ट्र राज्यसरकारने पूर्वीच्या आदेशामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

महिलांना पीएम उज्वला योजनेअंतर्गत मिळणार, मोफत गॅस सिलेंडर असा करा अर्ज!

या नवीन नियमानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना आपल्या कुटुंबातील पुरुषांच्या किंवा सदस्याच्या नावावर असलेले गॅस कनेक्शन हे स्वतःच्या नावावर हस्तांतरित करून घ्यावे. असे आवाहन या राज्य शासनाकडून करण्यात आलेले आहे. व हे गॅस कनेक्शन महिलांनी स्वतःच्या नावावर करून घेतल्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी मोफत 3 गॅस सिलेंडर हे भेटणार आहे.

2 thoughts on “राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी खास बातमी, तरच भेटतील वर्षभरात 3 मोफत गॅस सिलेंडर!”

Leave a Comment

error: Content is protected !!