Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे 4,500 जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांच्या खात्यामध्ये 4500 हे जमा झालेले आहेत पण, अद्याप अनेक महिलांच्या खात्यामध्ये अजून 4,500 जमा झालेच नाही. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यामध्ये अद्याप तिसरा हप्ता जमा झाला नाही, त्या महिलांनी नेमकं काय करायचं आहे? चला तर मग जाणून घेऊयात.Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana:
खर तर ज्या महिलांच्या खात्यामध्ये अद्याप 4500 जमा झालेले नाहीत. त्यांनी अर्जात भरलेला बँकेचा तपशील हा एकदा तपासून पहावा. व हा भरलेला बँकेचा तपशील योग्य असल्यास तर तो आधार कार्डाशी लिंक आहे का? ते तपासून घ्या. जर बंक खात्याला आधारकार्ड लिंक नसेल, तर तुमच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला तो लवकरात लवकर जोडावा लागेन. तरच तुमच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होतील.
या प्रकारे तुम्हाला तुमच्या अर्जामधील ज्या काही चुका झालेल्या आहेत. त्या तुम्हाला पूर्णपणे सुधारून व्यवस्थित करून घ्यावे लागतील. या चुकामुळे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील 4500 हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. तर याबाबत तुम्ही अर्जातील माहिती ही व्यवस्थित करू शकतात. यानंतर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळतील.
तसेच, दुसरे व सर्वात अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या अनेक महिलांनी या अर्जामध्ये नवऱ्यासह बँकेमध्ये जॉईन अकाउंट चे खाते भरले आहेत. त्यामुळे जॉईंट अकाउंट धारकांना देखील हे पैसे येणार नाहीत. कारण, त्यामुळे तुमच्या एकट्याचे खाते उघडून ते अर्जामध्ये भरून घ्या. तरच तुम्हाला पैसे मिळतील . विशेषतः म्हणजे हे अकाउंट देखील आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.
जर तुमच्या अकाउंट हे आधार कार्डशी लिंक नसेल, तर तुम्हाला या योजनेचे पैसे तुमच्या ज्या बँक अकाउंटला तुमचे आधार कार्ड लिंक आहे. त्या अकाउंट मध्ये तुमच्या या योजनेचे पैसे येतील. व अशामुळे तुमच्या मध्ये घोळ निर्माण होईल, तर असं न करता तुम्ही ज्या बँकेच्या अकाउंटला तुमचे आधार लिंक आहे. तेच अकाउंट तुम्ही या अर्जामध्ये भरू शकतात.
1 thought on “ज्या लाडक्या बहिणींना या योजनेचे 4500 भेटलेच नाही, तर मग अशा महिलांनी पुढे काय करायचं?”