Onion Market Price: कांद्याचे बाजार भाव सध्या चढउताराच्या फेऱ्या मधून जात आहे. बाजारामध्ये सरासरी कांद्याचा दर 1800 ते 2400 रुपयांच्या दरम्यान आहे. तर गुणवत्ता पूर्ण कांद्याला 2600 रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. सध्या खरिपातील कांद्याची आवक सुरू असून दोन आठवड्यामध्ये रब्बी कांद्याची काढणे ही काही भागांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. रब्बी कांद्याच्या अवघेपर्यंत बाजारामधील भाव हा स्थिर राहील, असा अंदाज बाजारामधील अभ्यासकांनी वर्तवलेला आहे. Onion Market Price
जानेवारी मधील मोठे घसरण व सध्याची स्थिरावलेली स्थिती.
जानेवारीच्या सुरुवातीला बाजारामध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. त्या काळामध्ये कांद्याचे दर 4 हजार ते 5 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, पूर्ण पकवणी झालेल्या कांद्याची काढणी मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे बाजारातील आवक वाढली, व दरामध्ये मोठी घसरण झाली. जानेवारी मधील कांदा दर काही काळ 1300 ते 1800 रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र आवक कमी झाल्यानंतर कांद्याच्या दरामध्ये सुधारणा झाले असून सरासरी पातळी टिकून आहे.
पिकाचे नुकसान व शेतकऱ्यांची आव्हाने.
यंदा कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले होते. मात्र पाऊस बदलत्या हवामानामुळे कांद्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी एकरी उत्पादनामध्ये घट झाल्याचे शेतकरी सांगत आहे. याशिवाय आपल्याला चांगल्या भावाच्या अपक्षेने अनेक शेतकऱ्यांनी वेळेच्या आधी काढणी करून कांदा विकला. त्यामुळे खरिपांमधील कांद्याचे आवकेचा दबाव तुलनेने कमी राहणार असल्याचा अंदाज आहे.
इतक्या राज्यांमधील आवक,
महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश व राजस्थान मधील कांद्याचे आवक सध्या बाजारात दिसत आहे. राज्यातील आवक तुलनेने कमी असली तरी गुजरात, मध्य प्रदेश व राज्यस्थान मधून चांगली आवक होती. गुजरात मधील कांद्याला विशेषता चांगले दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. पुढील काळात महाराष्ट्रातील कांदा आवक काहीशी सुधारेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
निर्यातीला चालना मिळण्याची गरज.
सध्या भारतामधून कोलंबो, मलेशिया, व्हिएतनाम, बांगलादेश, युएई व श्रीलंका या देशांना कांद्या निर्यात होत आहे. मात्र 20 टक्के निर्यात शुल्क हा मोठा अडथळा ठरत आहे. सरकारने निर्यात शुल्क काढल्यास भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अधिक मागणी मिळेल, असा व्यापाऱ्यांचा विश्वास आहे. परंतु भारतीय कांद्याला इतर देशांमधील स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.