Panjabrao Dakh Havaman Andaj News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला नवीन अंदाज,पहा सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरामध्ये बेंगल चक्रीवादळाची निर्मिती झालेली होती, आणि या चक्रीवादळामुळे भारत देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये अगदी पावसाचे वातावरण होऊन मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. अशातच आता महाराष्ट्र राज्यामध्ये देखील हवामानामध्ये सतत बदल होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तुर पिक काढणीला मोठा फटका बसू शकतो. चला तर मित्रांनो आपण या हवामानाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.Panjabrao Dakh Havaman Andaj News

पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तमिळनाडू, कर्नाटक, पुंदुचेरी यासारख्या राज्यांमध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे आणि याचा प्रभाव आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. तर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद वर्तवण्यात आलेली आहे. त्याच दरम्यान पुन्हा एकदा राज्यांमध्ये पावसासाठी पोषक स्थिती तयार होत असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेच्या माध्यमातून समोर आलेला आहे.

आज पंजाबराव डखांनी या हवामानाबद्दल एक नवीन अंदाज जारी केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितला आहे कि, अवकाळी पावसा संदर्भामध्ये एक मोठी अपडेट दिलेली आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील हवामानामध्ये बदल होणार आहे. पण, फार मोठा पाऊस हा पडणार नाही.

पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पंजाबराव डख यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजाबाबत राज्यांमधील 21 ते 26 डिसेंबर दरम्यान ढगाळ हवामान राहणार असल्याची शक्यता वर्तवलेली आहे, आणि या काळामध्ये राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ हवामानाची शक्यता राहील.

या काळामध्ये राज्यातील नागपुर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये थोडाफार पाऊस पडू शकतो. पण मात्र, उर्वरित ठिकाणी फक्त ढगाळ हवामाना राहणार असल्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे. राज्यांमध्ये फार मोठा पाऊस पडणार नाही, यामुळे शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासादायक बातमी ठरणार आहे.

राज्यातील पूर्व विदर्भामधील नागपूर, वर्धा, चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमध्ये व छत्तीसगड, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे, आणि राज्याच्या कालावधीमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. म्हणून थंडीचे प्रमाण हे कमी राहणार. असे त्यांनी आपल्या नवीन बुलेटिन मध्ये हा अंदाज वर्तवलेला आहे.

अशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!