अर्थसंकल्पापुर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; अर्थमंत्र्यांनी केली पीएम किसान सन्माननिधी योजनेबाबत घोषणा, पहा सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Samman Nidhi Yojana Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्वजण 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पाची वाट पाहत आहेत. सध्या शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून खूप आशा आहेत. विशेष करून प्रधानमंत्री किसान सन्माननिधीमध्ये वाढ होण्याची चर्चा आहे. आता प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपये ते खात्यात दिले जातात. तर मित्रांनो ही रक्कम वाढवून 12000 करण्याचा दावा केला जात आहेत या सुधारण्याच्या आधीच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी ही माहिती दिलेली आहे.Pm Kisan Samman Nidhi Yojana Update

हेही वाचा 👉 फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांना भेटणार मोठी भेट; केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 4 हजार रुपये महिना, पहा सविस्तर माहिती!

पीएम किसान सन्माननिधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा 19 वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून, या योजनेचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 24 फेब्रुवारी रोजी बिहार मधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत. अशी माहिती कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिलेली आहे, आणि या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा केले जातात. यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी 18 वा हप्ता हा वाशिम येथून हस्तांतरित करण्यास सुरुवात केली होती. देशांमधील 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ भेटतो.

पीएम किसान सन्मान निधी योजना ही केव्हापासून सुरू झालेली आहे?

केंद्र सरकारने 2019 मध्ये पी एम किसान सन्माननिधी योजना ही सुरू केली आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे आणि या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. आणि तसेच वर्षांमध्ये तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात असतात आतापर्यंत पीएम किसान सन्माननिधी योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

हेही वाचा 👉 फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांना भेटणार मोठी भेट; केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 4 हजार रुपये महिना, पहा सविस्तर माहिती!

कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार नाही लाभ?

पी एम किसान सन्माननीय योजनेच्या लाभार्थ्यांची यादी ही ऑनलाईन उपलब्ध आहे त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्माननीती या योजनेचा 19 वा हप्ता मिळेल की नाही हे तपासता येईल त्यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

अर्थसंकल्पाविषयी 5 मनोरंजन गोष्टी पहा.

पी एम किसान सन्माननिधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे फार्मर कॉर्नर यावरती क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला लाभार्थी यादी हा पर्याय निवडायचा आहे आणि त्यानंतर एक फार्म उघडेल त्यामध्ये प्रथम तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव नंतर जिल्ह्याचे नाव, ब्लॉक व गाव निवडावा लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्ट यावरती क्लिक करा आणि यानंतर तुमच्या गावातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्याची यादी मिळेल जर तुमचे नाव यादीत असेल तर तुमच्या खात्यामध्येही पैसे येतील.

1 thought on “अर्थसंकल्पापुर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; अर्थमंत्र्यांनी केली पीएम किसान सन्माननिधी योजनेबाबत घोषणा, पहा सविस्तर माहिती!”

Leave a Comment

error: Content is protected !!