Tur Rate: शेतकऱ्यांनो तुरीचे भाव कधी वाढणार? तर जाणून घ्या; सोयाबीन, ज्वारी व कापूस या पिकाचे बाजारभाव!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Rate: भारत देशांमधील कृषी बाजारात विविध पिकांच्या भावात चढ-उतार दिसून येत आहे. सध्या तुरीच्या भावावरती दबाव निर्माण झालेला असून, काही ठिकाणी अगोदरची दूर बाजारामध्ये विक्रीसाठी आणली जात आहे. मात्र बाजारामध्ये आवक कमी असल्यामुळे तुरीला 6900 ते 7300 पर्यंत भाव भेटत आहे. उत्पन्न वाढीच्या अंदाजामुळे भावावर दबाव आहे, पण आवकेचा दबाव कमी झाल्यामुळे भावामध्ये सुधारणा होऊ शकते असे बाजारामधील तज्ञ सांगत आहे.Tur Rate

ज्वारी या पिकाचा बाजार भाव,

मित्रांनो ज्वारीच्या बाजारामध्ये देखील कमी दरांचा प्रभाव दिसत आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी ज्वारीच्या भावामध्ये घसरण होण्याची प्रक्रिया सुरू आहे. खरिपात उत्पन्न वाढल्यामुळे व रब्बीमध्ये देखील चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेने ज्वारीच्या भावावर दबाव आलेला आहे. सध्या ज्वारी 2400 ते 3000 रुपयांच्या दरामध्ये खरेदी विक्री केली जात आहे. या दरम्यान रब्बी मधील उत्पादन वाढत असले, तरी उष्णता ज्वारीच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम करू शकते. असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

पहा लसूण बाजार भाव,

लसणाच्या बाजारामध्ये हलका दबाव दिसून येत आहे. नवीन लसणाची आवड वाढली आहे त्यामुळे त्याच्या नावामध्ये चवदार आणि देखील सुरुवात झालेली आहे. तर काही दिवसांपूर्वी लसणाच्या भावांमध्ये 2000 ते 3000 रुपयांची घट झाली आहे. सध्या लसूण 1300 ते 1600 रुपयांच्या दरामध्ये विकला जात आहे. लसणाची आवक अधिक वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे भावावर याचा परिणाम होऊ शकतो असं व्यापाऱ्यांच म्हणणं आहे.

सोयाबीन पिकाचा बाजारभाव,

सोयाबीन व सोयापेंडच्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या नरमाई दिसून येत आहे सोयाबीनचे वैद्य हे 10.42 प्रतिवशेलपर्यंत कमी झाले आहे. व तसेच सोयाबीनचे फायदे 299 डॉलर प्रति टनापर्यंत खाली आले आहेत. देशामधील सोयाबीन बाजार मध्ये मंदी कायम आहे, व तर स्थिर राहण्याची शक्यता आहे. सध्या सोयाबीनचा भाव 3 हजार 900 ते 4 हजार 100 रुपयांच्या दरम्यान आहे.

कापूस पिकाचा बाजार भाव,

कापूस बाजारांमधील भाव स्थिर राहिलेले आहेत कापसाची बाजारामध्ये आवक रोज 1.5 लाख गाठीवर आहे. व उद्योगांची खरेदी मात्र गरजेपुरतीच सुरू आहे. कापसाला सरासरी 7000 ते 7300 रुपयांचा दर भेटत आहे. आगामी कल आठवड्यामध्ये कापसाच्या अवकांमध्ये घट होऊ शकते, त्यामुळे कापूस दरामध्ये काहीशी सुधारणा होण्याची शक्यता आहे.

1 thought on “Tur Rate: शेतकऱ्यांनो तुरीचे भाव कधी वाढणार? तर जाणून घ्या; सोयाबीन, ज्वारी व कापूस या पिकाचे बाजारभाव!”

Leave a Comment

error: Content is protected !!